निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला, वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:05 PM2019-04-22T13:05:03+5:302019-04-22T14:12:59+5:30

पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filing a complaint against a senior assistant of the Malkapur Panchayat Samiti | निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला, वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला, वरिष्ठ सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी (२२ एप्रिल) मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन गुलाब निळे यांनी तहसील कार्यालयातील आचारसंहिता सेल अव्वल कारकून मनोज सातव यांच्याशी दारू प्यायल्यानंतर अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली.

मलकापूर  - पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक सचिन निळे यांनी निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सोमवारी (२२ एप्रिल) मलकापूर शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पंचायत समितीमध्ये वरीष्ठ सहायक पदावर कार्यरत सचिन गुलाब निळे (वय ३९) यांनी तहसील कार्यालय येथे येवून तहसील कार्यालयातील आचारसंहिता सेल अव्वल कारकून मनोज सातव यांच्याशी दारू प्यायल्यानंतर अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. तसेच निवडणूक आयोगास सुद्धा शिवीगाळ करुन माझे एका शो कास नोटीसने काय होणार? माझे कोणीही काय वाकडे करू शकत नाही, अशा शब्दात शिवीगाळ केली. 

सचिन निळे यांची लोकसभा निवडणुक २०१९ करीता स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये सहायक म्हणून आचारसंहिता सेल मधून निवडणूकीचे अत्यंत महत्त्वाचे कामात १४ मार्च २०१९ पासबन नियुक्ती करण्यात आली होती. याबाबत आचारसंहिता अधिकारी यांनी आरोपी कर्मचारी यांना आधी सुद्धा कर्तव्यावर हजर नसल्याबाबत त्यांचे कार्यालय पंचायत समिती मलकापूर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही आरोपी कर्मचारी याने अत्यंत महत्त्वाचे निवडणूक ड्युटीवर हलगर्जीपणा करीत दारू प्यायल्यानंतर शिवीगाळ केली.  या प्रकरणी नायब तहसीलदार गजानन राजगडे यांनी शहर पो. स्टे.ला दिलेल्या तक्रारीवरून  आरोपी विरुद्ध भादंवि १७८/२०१९ कलम १३४ व लोक प्रतिनिधित्व कायदा 1953 सह कलम ५०४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि शैलेश पवार करीत आहे. 
 

Web Title: Filing a complaint against a senior assistant of the Malkapur Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.