Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

By दिनेश पठाडे | Published: April 24, 2024 12:41 PM2024-04-24T12:41:41+5:302024-04-24T12:42:59+5:30

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे.

Buldhana: ST will go to the wedding of democracy, two days of service will be affected, arrangements have been made for 270 buses from all depots in Buldhana district. | Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

- दिनेश पठाडे 
बुलढाणा - लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे.

बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विधानसभानिहाय तयारी पूर्ण करण्यात आली असून जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने त्या-त्या विभागाला कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व इतर साहित्य ने-आण करणे यासह कर्मचाऱ्यांना बूथस्थळी घेऊन जाण्यासाठी एसटी बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २७० बसेस २५ आणि २६ एप्रिलपर्यंत निवडणुकीविषयक कामकाजासाठी राखीव असणार आहेत. सर्व बसेस सुव्यवस्थित पाठविल्या जाणार असून त्यासाठी प्रत्येक बसेसची आवश्यक तपासणी मागील दोन ते तीन दिवसांपासून केली जात आहे. प्रत्येक बसेसच मेटनन्स, टायर चेकअप, कुशनची व्यवस्था व इतर बाबींची दक्षता घेऊनच गुरुवारी बसेस निवडणूक मतदान कामासाठी रवाना होणार आहेत.
 
दोन दिवस एसटीचा प्रवास टाळा
२६ एप्रिलला होऊ घातलेल्या निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातून २७० बसेस राखीव ठेवण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळीच बसेस निवडणूक कामासाठी रवाना होतील. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस जिल्ह्यातील आगार अंतर्गत धावणाऱ्या बसेस जवळपास बंदच राहणार आहेत. जिल्हा बाहेरील आगाराच्या बसेस तेथील नियोजनानुसार सुरु राहू शकतात, असे बुलढाणा आगार व्यवस्थापकांकडून कळविण्यात आले.
 
कोणत्या आगारातील किती बसेस राखीव
बुलढाणा : ४२
चिखली : ३९
खामगाव : ३१
मेहकर : ८६
जळगाव जामोद : ४०
मलकापूर : ३२ 

Web Title: Buldhana: ST will go to the wedding of democracy, two days of service will be affected, arrangements have been made for 270 buses from all depots in Buldhana district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.