Buldhana Election Results 2019: Harshwardhan Sapkal vs Vijayraj Shinde, Maharashtra vidhan sabha election Results 2019 | बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर?
बुलडाणा निवडणूक निकाल : सपकाळ गड राखतात की उलटफेर?

बुलडाणा: गेल्या वेळच्या प्रमाणेच बुलडाणाविधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही चौरंगी होत असून अटितटीच्या या लढीमध्ये कोण बाजी मारतो याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून ‘जुने गडी; नवा निकाल’ अशी स्थिती राहते की काही आश्चर्यकारक निकाल लागतो याकडे मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, गेल्यावेळी अशाच रंगतदार लढतीमध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी बाजी मारली होती. यंदा ते आपला गड कायम ठेवतात की काही उलटफेर येथे होतो याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, शिवसेनेकडून येथे संजय गायकवाड, भाजपचे बंडखोर योगेंद्र गोडे आणि वंचित बहुजन आघाडीकडून शिवसेनेचे तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेले माजी आमदार विजयराज शिंदे हे भाग्य आजमावत आहे. यापैकी कोणाला मतदारराजा कौल देतो हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.

गेल्यावेळी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ४५ हजार,८६० मते घेऊन त्यावेळी मनसेकडूननिवडणूक लढविणाºया संजय गायकवाड यांचा पराभव केला होता.


Web Title: Buldhana Election Results 2019: Harshwardhan Sapkal vs Vijayraj Shinde, Maharashtra vidhan sabha election Results 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.