Buldana Election 2019: Congress candidate complains of 'booth capturing' | बुलडाणा निवडणूक 2019 : काँग्रेस उमेदवाराने केली ‘बुथ कॅप्चरिंग’ची तक्रार 
बुलडाणा निवडणूक 2019 : काँग्रेस उमेदवाराने केली ‘बुथ कॅप्चरिंग’ची तक्रार 

खामगाव: शहरातील काही बुथ प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून कॅप्चर करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेस आघाडीच्या उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी सोमवारी स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये केली. या तक्रारीमुळे ऐन निवडणुकीच्या दिवशी खामगावात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक २, सतीफैल मतदादन केंद्रावरील बुथ क्रमांक १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८ तर गोपाळ नगर महाराष्ट्र विद्यालय येथील १७०, तर भोईपुरा येथील भारतरत्न राजीव गांधी नगर पालिका शाळा  शाळा क्रमांक ३, मतदान केंद्रातील बुथ क्रमांक १६५, १६६, १६७, १६८, १६९ आणि टिळक राष्ट्रीय विद्यालय मतदान केंद्रातील  बुथ क्रमांक १५२, १५३  या केंद्रावर प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली.  उपरोक्त मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्याचीही मागणी या तक्रारीत करण्यात आली.
(प्रतिनिधी)


Web Title: Buldana Election 2019: Congress candidate complains of 'booth capturing'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.