छावणी परिषद हद्दीतील घरपट्टी माफ करा ;सेवानिवृत्त जवानांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 20:11 IST2020-03-17T20:08:13+5:302020-03-17T20:11:54+5:30
देवळाली छावनी परिषदेच्या हद्दीतील सेवानिवृत्त लष्करी जवांनाकरिता छावनी प्रशासनाने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, यासंदर्भातील परिसरातील सेवानिवृत्त जवानांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहेत.

छावणी परिषद हद्दीतील घरपट्टी माफ करा ;सेवानिवृत्त जवानांची मागणी
नाशिक : महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे देवळाली छावनी परिषदेच्या हद्दीतील सेवानिवृत्त लष्करी जवांनाकरिता छावनी प्रशासनाने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, यासंदर्भातील परिसरातील सेवानिवृत्त जवानांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणाºया लष्करी जवानांना घरपट्टी माफीची घोषणा केल्यानंतर यासंदर्भातील मागणी जोर धरून लागली आहे. या निर्णयाची लवकारात लवकर अंमलबजावणी करावी तसेच सदर योजना महापलिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत यासह राज्यातील सर्व छावणी परिषदेनाही नियम लागू करावा, अशी मागणी सेवानिवृत्त सुभेदार मेजर दिनकर पवार, लक्ष्मीकांत पारनेरकर, गुरुदास पाटोळे, विजय पवार, फुलचंद पाटील, लक्ष्मण चौधरी आदी सेवानिवृत्त माजी सैनिकांनी केली आहे. लष्करी जवान व सेवानिवृत्त जवानांना छावणी परिषदेच्या हद्दीत लाभ मिळावा याकरिता दादा भुसे यांना भेटून त्यांच्या मागण्यांसदर्भात निवेदन दिले आहे.