दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू; सलग चार दिवसांतील तिसरा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 15:35 IST2023-07-18T15:32:57+5:302023-07-18T15:35:40+5:30
पवनी तालुक्यातील कोंढा ते पालोरा (चौ.) मार्गावरील घटना

दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू; सलग चार दिवसांतील तिसरा अपघाती मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : भंडारा ते पवनी मार्गावर ब्राह्मणी येथील २८ वर्षीय युवकाचा मोटारसायकल घसरल्याने डोक्याला मार लागून भर रस्त्यावर जागीच मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील कोंढा ते पालोरा (चौ.) मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली. जितेंद्र यशवंत मडावी असे तरुणाचे नाव आहे.
कोंढा परिसरात अपघाताने मृत्यू होण्याची चार दिवसातील ही सलग तिसरी घटना आहे. सोमवारी १७ जुलैच्या रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान जितेंद्र आपली कामे आटोपून राहत्या गावी ब्राह्मणीला जात होता. यावेळी पाऊसही सुरू होता. अशातच, कोंढा ते पालोरा (चौ.) राज्यमार्गावर पाण्याच्या टाकीजवळ त्याची मोटरसायकल घसरून पडल्याने डोक्याला जबर मार लागला. यात तो जागीच मृत झाला. जितेंद्र अविवाहित होता, त्याच्या निधनाबद्ल गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक फौजदार सुभाष मस्के करीत आहे