ट्रकच्या धडकेत महिला ठार, साकोली तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:09 IST2023-04-21T17:09:04+5:302023-04-21T17:09:31+5:30
मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक

ट्रकच्या धडकेत महिला ठार, साकोली तालुक्यातील घटना
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : साकोली तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकच्या धडकेत पतीसह दुचाकीवरून निघालेली महिला घटनास्थळी ठार झाली. अगदी पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा जीव गेला.
शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जितेंद्र धर्मराज बन्सोड (४९) आणि त्यांची पत्नी भद्रशिला (४०) सावरी जवाहरनगरवरून गोंदिया येथे नातेवाईकांच्या घरी दुचाकीने वास्तुपुजनाला जात होते. दरम्यान, मुंडीपार शिवारात अज्ञात ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात भद्रशिला या घटनास्थळी ठार झाल्या. शव उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आले. साकोली पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.