परवाना असूनही आमदार खासदारांकडे बंदूक का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:27 IST2025-01-22T13:26:29+5:302025-01-22T13:27:23+5:30

Bhandara : सारेच म्हणतात, गरजच नाही; जनता हेच रक्षक!

Why don't MLAs and MPs have guns despite having a license? | परवाना असूनही आमदार खासदारांकडे बंदूक का नाही?

Why don't MLAs and MPs have guns despite having a license?

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
जिल्ह्यात तीन आमदार आणि एक खासदार आहेत. जनप्रतिनिधी म्हटल्यावर या सर्वांनाच स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना काढून बंदूक अथवा पिस्तूल वापरता येते. मात्र, जिल्ह्यात दोन आमदारांकडे शस्त्र परवाने आहेत. असे असले तरी ते शस्त्र वापरत नाहीत. तर एक आमदार व खासदारांकडे परवाना नाही. त्यामुळे त्यांच्याकडे बंदूक नसल्याची माहिती आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे जनतेत फिरताना भीती कसली. जनता आणि कार्यकर्तेच आमचे रक्षणकर्ते आहेत, असे सर्वांचे मत आहे.


तुम्हालाही मिळू शकते शस्त्र 
भारतीय शस्त्र कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय नागरिकाला शस्त्र परवाना मिळविता येऊ शकतो. आत्मसंरक्षण (जंगली प्राण्यांपासून रक्षणासाठीही) आणि शेतीच्या संरक्षणासाठीही परवाना मिळतो. अर्जदाराची आवश्यकता, जीवितास धोका, व्यवसाय, चारित्र्य पार्श्वभूमी, नागरिकत्व आदींची पडताळणीनंतर परवाना मिळू शकतो.


खासदारांकडेही नाही बंदुकीचा परवाना 
भंडारा-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे नव्याने निवडून आले. त्यांना यासंदर्भात विचारणा केली असता, आपल्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याने बंदूकही नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.


अर्ज कोठे, कसा कराल? 
हा शस्त्र परवाना मिळविण्यासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज भरून तो स्थानिक जिल्हा प्रशासन, म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत किंवा ज्या ठिकाणी पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आहेत, त्या ठिकाणी पोलिस आयुक्ताकडे हा अर्ज करावा लागतो.

नाना पटोले : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. मात्र, त्यांनी परवान्यासाठी कधीच अर्ज केला आहे. जनताच आपले रक्षक असल्याने शस्त्र बाळगण्याची गरज नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. 
नरेंद्र भोंडेकर : नरेंद्र भोंडेकर हे दुसऱ्यांदा भंडारा मतदारसंघातून विजयी झाले. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे. त्यांनी तो नुतनीकरणासाठी दिला आहे. 
राजू कारेमोरे : यांच्याकडे बंदूकीचा परवाना आहे. मात्र आमदार झाल्यापासून त्यांनी ते वरठी पोलिसस्टेशनला शस्त्र जमा केले आहे.

Web Title: Why don't MLAs and MPs have guns despite having a license?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.