भंडारा जिल्ह्यात २६ गावांचे जलस्रोत दूषित; दूषित पाण्याने चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:09 IST2025-07-25T16:08:47+5:302025-07-25T16:09:27+5:30
Bhandara : ४४ पेक्षा अधिक जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य

Water sources of 26 villages in Bhandara district contaminated; Concerns raised over contaminated water
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने ७६६ गावांपैकी ७५२ गावांतील जलस्रोतांची तपासणी केली असून, २६ गावांतील जलस्रोत दूषित, रासायनिकदृष्ट्वा अपायकारक किंवा जिवाणूयुक्त असल्याचे निष्पन्न झाले, जिल्ह्यातील ४४ पेक्षा तसेच जास्त जलस्रोत पेयजलासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले. या दूषित पाण्यामुळे डेंग्यू कॉलरा, हिपॅटायटिस, टायफॉइड यांसारखे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरवर्षी दोन वेळा एप्रिल ते जुलै आणि ऑक्टोबर ते मार्चमध्ये भंडारा, मोहाडी, तुमसर, साकोली आणि लाखांदूर येथील जिल्हा परिषद प्रयोगशाळांमध्ये जलस्रोतांची रासायनिक व जाते. यंदा एकूण ७४० गावांतील पाण्याची रासायनिक व ७५० गावांतील जिवाणू तपासणी करण्यात आली. यापैकी २६ गावांत पाणी आरोग्यासाठी धोका ठरले, तर ४४ जलस्रोत पूर्णपणे पेयजलासाठी अयोग्य ठरले.
जिल्ह्यातील वैनगंगा नदीचे पाणीही प्रदूषित असून यामुळे शहर व गावांमध्ये पाणीटंचाईचे समस्या वाढल्या आहेत. गोसेखुर्द प्रकल्पामधील जलवाहिन्यांचा व राज्य यंत्रणांचा अभाव यामुळे नदीप्रवाहाचा नुकसानीचा फटका स्थानिक लोकांना सहन करावा लागत आहे. या परिस्थितीत जलस्रोतांची शुद्धता आणि पाण्याच्या उपलब्धतेसाठी जलसंधारण व स्वच्छता योजनेवर अधिक भर देणे अत्यावश्यक आहे.
जिल्हा प्रशासनाने दूषित जलस्रोतांतर त्वरित योग्य उपचार करून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यदृष्ट्या स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळावे, या दिशेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या तपासणीतील निष्कर्ष नागरिकांसाठी आव्हान असून, प्रदूषित पाणी पिण्यापासून वंचित राहणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
उपाययोजनांची गरज
दूरदृष्टीने जिल्ह्यातील गावांमध्ये शाश्वत जलसंधारण प्रकल्प राबविणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे खोदणे आणि जलशुद्धीकरण यंत्रणा सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे, जेणेकरून जलदूषिततेचा परिणाम कमी करता येईल आणि गावातील पाण्याचा दर्जा सुधारता येईल, अशा उपाययोजनांनीच भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याची गुणवत्ता सुधारून लोकसंविधानसंबंधी आरोग्याच्या संकटांपासून मुक्तता मिळणे शक्य होणार आहे.
"भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी वर्षातून दोनवेळा जलस्रोतांची तपासणी केली जाते. ब्लीचिंग पावडर, फिटकरीचा वापर करून शुद्धीकरण केले जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा जलतपासणी करून पाणी वापरण्यास योग्य आहे का, हे निश्चित केले जाते. पावसाळ्यानंतर जलस्रोतांमध्ये बदल होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे पुन्हा तपासणी मोहीम राबवण्यात येईल. त्यासाठी यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या जातील."
- माणिक चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा