दोन दुचाकींची समोरासमोर धडक, २ गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 13:53 IST2023-04-15T13:51:47+5:302023-04-15T13:53:07+5:30

लाखांदूर-वडसा मार्गावरील घटना

Two bikes collide head-on on lakhandur wadsa route; 2 seriously injured | दोन दुचाकींची समोरासमोर धडक, २ गंभीर जखमी 

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, २ गंभीर जखमी 

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना लाखांदूर ते वडसा मार्गावरील सोनी गावानजीक घडली.

अजय दिगांबर शहारे (२५) व मुकेश देशमुख (२९, दोन्ही रा. सोनी) अशी अपघातातील जखमी युवकांची नावे आहेत. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी दुचाकी चालक गोवर्धन महादेव कुथे (४८, रा. सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: Two bikes collide head-on on lakhandur wadsa route; 2 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.