पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 17:14 IST2023-04-15T17:13:31+5:302023-04-15T17:14:24+5:30

देव्हाडी येथील घटना : सहा महिन्यांपासून सुरू होता पैशासाठी तगादा

the married woman hanged herself after fed up with the trouble of her husband and mother-in-law | पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास

मोहन भोयर  

तुमसर (भंडारा) : सहा महिन्यापासून पती व सासूकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून रागाच्या भरात विवाहितेने त्रासाला कंटाळून राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. ही घटना १४ एप्रिलच्या रात्री घडली. हिमाक्षी सतीश बेलेकर (२६, कुंभार टोली, देव्हाडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती सतीश देविदास बेलेकर (३०) व सासू रत्नमाला देविदास बेलेकर (६०) यांना अटक केली आहे. हिमाक्षीचे वडील हेमराज सुक्कल गजभिये (५३, अंबाझरी टेकडी, नागपूर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: the married woman hanged herself after fed up with the trouble of her husband and mother-in-law