घरून निघून गेलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह नाल्यात आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 17:57 IST2023-07-15T17:54:20+5:302023-07-15T17:57:08+5:30
ती तीन ते चार दिवसांपूर्वी घरून कुणालाच न सांगता निघून गेली होती

घरून निघून गेलेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह नाल्यात आढळला
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : घरून निघून गेलेल्या व मानसिक आजारी असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह पवनारा येथील नाल्यात शनिवारी सकाळी आढळला. मृत महिलेचे नाव मन्थुरा नंदराम पटले (८०) असे असून ती पवनारा (ता. तुमसर) येथील रहिवाशी आहे.
मन्थुरा नंदराम पटले ही तीन ते चार दिवसांपूर्वी घरून कुणालाच न सांगता निघून गेली होती. तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईक व परिसरात शोध घेतला परंतु ती कुठेच आढळली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तुमसर पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती. शनिवारी सकाळी पवनारा नाल्यात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. सदर मृतदेह मन्थुरा पटले हिचे असल्याची ओळख पटली. मृत महिला मानसिक आजारी होती, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.