जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस बरसला, वातारणात गारवा
By युवराज गोमास | Updated: June 9, 2023 15:56 IST2023-06-09T15:55:50+5:302023-06-09T15:56:31+5:30
डक उन्हाने लाही लाही होणाऱ्या शरिराला थंड हवेची झुळूक मिळाली

जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस बरसला, वातारणात गारवा
भंडारा : राज्यात मान्सूनपूर्व पाऊस होण्यास उशिर असतांना शुक्रवारला अडीच वाजताचे दरम्यान शहरात वादळी पाऊस बरसला. पावसाने आगमनाने वातारणात गारवा निर्माण झाला. कडक उन्हाने लाही लाही होणाऱ्या शरिराला थंड हवेची झुळूक मिळाली. बच्चे कंपनीने पावसात भिजत आंनद उपभाेगला.
जिल्ह्यात सन २०२३-२४ च्या खरीप हंगामात २ लाख १ हजार ५९८ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यातच धान पिकाचे क्षेत्र १ लाख ८८ हजार २६३ राहणार आहे. याशिवाय सोयाबीन, भाजीपाला, कापूस, ऊस व धुऱ्यावर तुर, तिळ पिकांची लागवड होणार आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने ग्रामीण भागात मान्सूनपूर्व शेतीची कामे आटोपण्याला वेग आला आहे. धान पेरणीची जागा तयार करण्यासाठी नागरणी, वखरणी, धुऱे व शेतातील तणकट काढणे, कचरा व काट्या गोळा करणे, धुरे जाळून स्वच्छ करणे, जनावरांची वैरण गोळा करून गावात पोहचते करणे, कचरा जाळणे आदी व अन्य कामांना वेग आला आहे.