Nana Patole : मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल... नंतर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:13 PM2022-01-17T19:13:21+5:302022-01-17T19:16:44+5:30

Nana Patole : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात  जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते

Nana Patole : I can hit Modi, I can even swear; Nana Patole's video goes viral ... Now explanation | Nana Patole : मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल... नंतर दिलं स्पष्टीकरण

Nana Patole : मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचा व्हिडीओ व्हायरल... नंतर दिलं स्पष्टीकरण

Next

भंडारा : मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे केलेल्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी होत आहे. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्या गृह मतदार संघात  जेवनाळा येथे रविवारी मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी नाना पटोले म्हणाले, मी का भांडतो. गेल्या ३० वर्षापासून राजकारणात आहेत. लोक पाच वर्षात आपल्या पिढीचा उद्धार करतात. शाळा-काॅलेज काढतात. मी एवढ्या वर्षाचा राजकारणात आहे. एक शाळा घेतली नाही. ठेकेदारी केली नाही. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, मोदीला शिव्या देऊ शकतो. म्हणूनच मोदी माझ्या विरोधात प्रचारासाठी आले होते, असे नाना पटोले म्हणताना व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशलमिडीयावर जिल्ह्यात व्हायरल होत आहे.

मी आमच्याकडील गावगुंडाबाबत बोललो - नाना पटोले

जेवनाळा येथील सभेत काही नागरिक आमच्या परिसरातील मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार घेऊन आले होते. त्यांना तुम्ही घाबरु नका. मी तुमच्या सोबत आाहे. मोदीला मी मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे म्हटले. मी कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जात आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'लोकमत'ला सांगितले.

Web Title: Nana Patole : I can hit Modi, I can even swear; Nana Patole's video goes viral ... Now explanation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.