भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद शिक्षकांचे तीन महिन्यांपासून वेतन नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:28 IST2025-06-26T18:26:58+5:302025-06-26T18:28:23+5:30

शिक्षकांवर उपासमारीची वेळ : शिक्षकांचा वाली कोण?

Municipal council teachers in Bhandara district have not been paid for three months! | भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद शिक्षकांचे तीन महिन्यांपासून वेतन नाही!

Municipal council teachers in Bhandara district have not been paid for three months!

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यातील नगर परिषद शाळेतून सेवानिवृत्त झालेले १३७ शिक्षकांची पेन्शन, तसेच कार्यरत असलेल्या ३५ अशा १७२ प्राथमिक शिक्षकांचे गत तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. नागपूर विभागातील सुमारे ४०० पेक्षा अधिक सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांचे पगार अडले. त्यामुळे शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर परिषद शिक्षकांचा वाली कोण? असा शिक्षकांनी प्रशासनाला सवाल केला आहे.


नागपूर विभागातील नगर परिषद, नगर पालिका, तसेच महानगरपालिकाअंतर्गत सुरु असलेल्या प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांची पेन्शन, तसेच कार्यरत शिक्षकांचे दरमहा वेतन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत अदा केले जाते. शिक्षक शालार्थ बनावट आयडी प्रकरणी हे कार्यालय चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे.


आजपासून आंदोलनाला प्रारंभ
खासगी शाळेतील बनावट प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्था शाळेतील शिक्षकांचे वेतन अडले. बुधवारी विदर्भ नगर परिषद शिक्षक संघाने नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केले. या आंदोलनात एस. बी. रायकवार, ललिता रेल्वेवार, भावना राऊत, इंदिरा पडोळे, प्रकाश बामन, भास्कर उपरीकर, अविनाश गजबे, हर्षल नंदागवळी, एस. डी. मेंढे, आय. बी. पडोळे आदी शिक्षक उपस्थित होते.


"वेतनाअभावी गृहकर्जाचे हप्ते चुकले, तीन महिन्यांचे व्याज वाढले, एलआयसी, आयकर, तसेच इतर कपाती बंद झाल्या आहेत. नियमित पगार व्हावे, ही मागणी आहे."
- हर्षल नंदागवळी, प्रभारी मुख्याध्यापक, बोस प्रा. शाळा, पवनी.


"मी ९२ वर्षांचा असून, शरीर थकले, नियमित औषधी लागतात. यासाठी पैशांची गरज असते. तीन महिने झाले पेन्शनच मिळाली नाही. जगावे की मरावे, अशी अवस्था आहे."
- गोपाळराव माटूरकर, सेवानिवृत्त शिक्षक न. प. भंडारा.


 

Web Title: Municipal council teachers in Bhandara district have not been paid for three months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.