भंडाऱ्यातील ऑर्डिनेन्स फॅक्टरीत मोठा स्फोट; सात कामगारांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:58 IST2025-01-24T12:41:03+5:302025-01-24T12:58:42+5:30

Bhandara Factory Blast: सुमारे अर्धा तासापूर्वीची घटना, भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणी मध्ये मोठा स्फोट झाला आहे.

Major explosion at Jawahar Nagar Ordnance Factory in Bhandara district | भंडाऱ्यातील ऑर्डिनेन्स फॅक्टरीत मोठा स्फोट; सात कामगारांचा मृत्यू, अनेक जण मलब्याखाली अडकले

Major explosion at Jawahar Nagar Ordnance Factory in Bhandara district

Bhandara Factory Blast: भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. ही घटना एलटीपी प्लांट मध्ये सकाळी सव्वा नऊ वाजता च्या दरम्यान घडली.  एक इमारत पूर्णतः उडाली असून कामगार दगावल्याची माहिती आहे. सात कामगार दगावल्याची माहिती असून आकडा वाढण्याची शक्यता आहे. इमारतीच्या मलाब्याखाली काही मृतदेह अडकले असून काही जखमी सुद्धा अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे

दरम्यान जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आयुध निर्माणी जवाहर नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक स्फ़ोट झालेला असून त्यामध्ये काही काम करणारे कर्मचारी हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.  एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आले आहे.

यापूर्वीही झाली होती घटना

जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) २७  जानेवारी २०२४ मध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यातएक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता

Web Title: Major explosion at Jawahar Nagar Ordnance Factory in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.