Lok Sabha Election 2019; खोटी आश्वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:52 IST2019-04-05T21:52:02+5:302019-04-05T21:52:56+5:30
धानाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागते, रोजगाराच्या बाता करून पोट भरत नाही, जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ताधारी भाजपाने खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक केली, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Lok Sabha Election 2019; खोटी आश्वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाला भाव नाही, सिंचनाच्या सोयी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी वनवण भटकंती करावी लागते, रोजगाराच्या बाता करून पोट भरत नाही, जीएसटी, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सत्ताधारी भाजपाने खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक केली, असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तुमसर तालुक्यातील विविध गावात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, प्रमोद तितीरमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, देवचंद ठाकरे, विठ्ठलराव कहालकर, माजी नगराध्यक्ष विजय डेकाटे उपस्थित होते. विकास करण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज असते, असे सांगून खासदार पटेल म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कामगारांची दैना झाली आहे. विकासाचा मुद्दा समोर करून विकास कुणाचा झाला हे तुम्हाला ठाऊक आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी हवे की प्रफुल्ल पटेल हवे हे तुम्हीच ठरवा. आलेली संधी हुकली तर पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल, ती येऊ देवू नका, अशी साद मतदारांना पटेल यांनी घातली. तालुक्यातील चुल्हाड, सितासावंगी, हसारा आणि तुमसर येथे आयोजित प्रचारसभांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.