Lok Sabha Election 2019; मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:41 IST2019-04-08T22:40:24+5:302019-04-08T22:41:17+5:30
नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सुत्रे आपल्या आशीर्वादाने हातात घेतली. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस देशाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प खरा करून दाखविला. आज आपला देश जगात समृद्ध देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जात असल्याचे प्रतिपादन भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी केले.

Lok Sabha Election 2019; मोदींच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची सुत्रे आपल्या आशीर्वादाने हातात घेतली. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस देशाच्या कल्याणासाठी वापरण्याचा संकल्प खरा करून दाखविला. आज आपला देश जगात समृद्ध देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर जात असल्याचे प्रतिपादन भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी केले.
लाखनी तालुक्यातील मुरमाडी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शेषराव वंजारी, राजेश बांते, बाळा शिवणकर, किशोर वाघाये, राजेश खराबे, रजनी पडोळे उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील मेंढे म्हणाले, सैनिक, शेतकरी, महिला अशा सर्व वर्गांना सक्षम करण्याचे महत्वपूर्ण कार्य मोदींच्या नेतृत्वात झाले आहे. देशात दरदिवशी २८ किमीच्या गतीने रस्ते तयार झाले आहे. प्रधानमंत्री आवासयोजनेंतर्गत देशात सर्वांना हक्काचे निवास उपलब्ध होत असल्याचे त्यांची सांगितले. दरम्यान लाखनी तालुक्यात प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.