"दुसऱ्या कुणाशी लग्न करू देणार नाही... " प्रेमाच्या नावाखाली धमकी आणि ब्लॅकमेलिंग; पवनीतील तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:23 IST2025-06-06T15:22:26+5:302025-06-06T15:23:00+5:30

Bhandara : आईच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्तचा गुन्हा

"I won't let you marry anyone else..." Threats and blackmail in the name of love; Young woman in Pawani commits suicide | "दुसऱ्या कुणाशी लग्न करू देणार नाही... " प्रेमाच्या नावाखाली धमकी आणि ब्लॅकमेलिंग; पवनीतील तरुणीची आत्महत्या

"I won't let you marry anyone else..." Threats and blackmail in the name of love; Young woman in Pawani commits suicide

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
अन्य कुणासोबतही लग्न करू देणार नाही, समाजात बदनामी करेल, अशी धमकी माजी प्रियकाराकडून मिळाल्याने तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना पवनी येथे ३ जूनच्या सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दुसऱ्या दिवशी ४ जूनला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साक्षी तलमले (२४) असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या आईच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी राजेश मोहते (२६) याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. 


माहितीनुसार, साक्षीचे गेल्या तीन-चार वर्षापासून शेजारी राहणाऱ्या राजेशशी प्रेमसंबंध होते. कुटूंबियांनी समजूत घातल्यावर साक्षीने त्याच्याशी बोलणे बंद केले आणि कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करण्यास तयार झाली. परंतु, आरोपी तिला धमक्या देत राहिला. 'दुसऱ्या कुणाशी लग्न करू देणार नाही. तसे झालेच तर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेल', अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे बदनामीच्या भीतीपोटी धास्तावलेल्या साक्षीने ३ जूनच्या संध्याकाळी ७:३० वाजता घरात कीटकनाशक गिळले. गंभीर अवस्थेत तिला पवनीहून भंडारा येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. ४ जूनला सकाळी ११.१५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.


राजेशचा मोबाइल जप्त
तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक चौकशीसाठी आणि प्रकरणाचे धोगदोरे शोधण्यासाठी राजेशचा मोबाइलदेखील जप्त करण्यात आला आहे. त्याची फॉरेन्सीक लॅबमध्ये तपासणी सुरु आहे. तरुणीची आई वंदना तलमले (४५) यांची तक्रार आणि भंडारा येथून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे भान्यास कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून अटक केली.

Web Title: "I won't let you marry anyone else..." Threats and blackmail in the name of love; Young woman in Pawani commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.