कधी बेल फळाचा रस प्यायले का? जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:36 IST2025-04-14T14:35:58+5:302025-04-14T14:36:53+5:30

Bhandara : रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास करते मदत

Have you ever drunk betel fruit juice? Know the benefits | कधी बेल फळाचा रस प्यायले का? जाणून घ्या फायदे

Have you ever drunk betel fruit juice? Know the benefits

अतुल खोब्रागडे
भंडारा :
उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या थंड पेयांचं सेवन करतात. यातील एक सर्वात फायद्याचा रस म्हणजे बेल फळाचा रस. बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत. 


बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास याचा फायदा काही दिवसांतच बघायला मिळेल. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सीसारखे आणखीही काही पोषक तत्वे आढळतात. बेलफळ हे एक आरोग्यवर्धक फळ आहे, जे पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करते.


भोलेनाथाचे प्रिय बेलपत्र
हिंदू धर्मात बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक धार्मिक कार्यात बेलपत्र वापरले जाते. भगवान शिवजीला प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतीने याच बेलपत्राचा उपयोग केला होता.


बेलफळाचे आरोग्यदायी फायदे

  • बेलफळात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि आतड्याची कार्यक्षमता वाढवतात.
  • बेलफळात जीवनसत्वे अ, ब आणि क असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.
  • बेलच्या साली आणि फांद्यांमध्ये असलेला फेरोनिया गम नावाचा घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
  • रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
  • बेल त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि अन्य समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच केशगळणे कमी करते.

Web Title: Have you ever drunk betel fruit juice? Know the benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.