किराणा व्यावसायिकाने शेतात केली आत्महत्या; काही दिवसांपूर्वी वडिलांचा झाला होता मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 18:57 IST2023-04-19T18:57:15+5:302023-04-19T18:57:27+5:30
किराणा व्यावसायिकाने शेतात जाऊन जीवन संपवले.

किराणा व्यावसायिकाने शेतात केली आत्महत्या; काही दिवसांपूर्वी वडिलांचा झाला होता मृत्यू
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा: तुमसर येथील प्रसिद्ध किराणा व्यवसायी विनोद गोविंदराव भुरे वय (४५, रामकृष्ण नगर) यांनी कोष्टी रोडवरील स्वतःच्या शेतातील टीनच्या शेडमध्ये लोखंडी हुकला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक १९ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान उघडीस आली.
विनोद भुरे हा नेहमीप्रमाणे कोष्टी रोडवरील शेतामध्ये सकाळी ८ वाजता नित्यनेमाने आपल्या शेतावर जायचे. घटनेच्या दिवशी दुपारी १२ वाजता दरम्यान त्यांनी शेतात काम करणाऱ्या नोकराला पिण्याच्या पाणी आणण्याकरिता बाहेर पाठवले. नोकर पाणी घेऊन परत आला असता ते गळफास लागल्याच्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविला. मृताचा किराणा व्यवसाय असून काही दिवसाआधी वडील गोविंदराव भुरे यांचा मृत्यू झाला होता, हे विशेष.