वरठी येथे चोख बंदोबस्त, मतदान केंद्रावर गर्दीस मज्जाव
By युवराज गोमास | Updated: November 20, 2024 17:38 IST2024-11-20T17:35:36+5:302024-11-20T17:38:03+5:30
१०० मीटर परिसरातील बाजारपेठा बंद : मतदारांच्या लांबच लांब रांगा

Good arrangements at Varathi, prevent crowding at polling station
युवराज गोमासे
भंडारा : मोहाडी तालुक्यातील वरठी जिल्हा परिषद क्षेत्रात मतदान शांततेत व वाढलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या तणावात सकाळपासून मध्यम गतीने सुरू होते. वरठी येथे काही मतदान केंद्रावर सकाळी लांब रांगा होत्या. काही मतदान केंद्रावर दुपारनंतर गर्दी पहावयास मिळाली. मतदान शांततेत सुरू होते. मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त व सुरक्षा रक्षकांची कडक व्यवस्था होती. मतदान केंद्रावर कार्यकर्ते तुरळक प्रमाणत दिसले. प्रथमच सुरक्षा यंत्रणा चोख दिसून आली.
सुरक्षा रक्षकांनी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात संपूर्ण बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या. मतदान केंद्रावर पूर्वी होणारी राजकीय गर्दी व प्रचार, प्रसार यासह जवळपास होणाऱ्या गर्दीस मज्जाव करण्यात आल्याने अनेकांची गोची झाली.
यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर असलेल्या आशा सेविका व स्थानिक स्वयंसेवकांनी यंत्रणेला मदत झाली. यामुळे राजकीय मदतनीसांची गणित गडबडले. अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते सायंकाळपर्यंत घराघरापर्यंत जाऊन मतदारांना मतदानासाठी बाहेर काढताना आढळले.