बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्याचा मृतदेह, तुमसर येथील घटनेमुळे खळबळ
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 30, 2023 17:26 IST2023-09-30T17:24:23+5:302023-09-30T17:26:30+5:30
महेश ढबाले याला दारूचे व्यसन असल्याची माहिती

बंद घरात आढळला महसूल कर्मचाऱ्याचा मृतदेह, तुमसर येथील घटनेमुळे खळबळ
भंडारा : तुमसर शहरातील श्रीराम नगरातील एका बंद घरात महसूल कर्मचाऱ्यांचा मृतदेह ३० सप्टेंबर रोजी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. महेश विठ्ठलराव ढबाले (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे.
शहरातील श्रीराम नगरात वास्तव्यात असलेल्या महेश ढबाले हा गोंदिया येथिल तहसिल कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत होता. तो अविवाहित होता अशी माहिती आहे. घटनेच्या दिवशी घराजवळील नागरिकांनी खिडकीतून डोकावुन बघितले असता तो मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
महेश ढबाले याला दारूचे व्यसन जडले होते अशी माहिती आहे. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शहारे करीत आहेत.