आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 17:59 IST2022-06-25T17:57:51+5:302022-06-25T17:59:05+5:30

बाजारात जाताना मोबाईलवर बोलणे महिलेच्या जीवावर बेतले.

A woman who was visiting her sick parents was killed in a truck crash | आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेली महिला ट्रकच्या धडकेत ठार

तुमसर (भंडारा) : आजारी आई-वडिलांच्या भेटीला आलेल्या महिलेला ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. घटना तुमसर येथील शिवाजीनगरातील टेलिफोन एक्सचेंज कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. बाजारात जाताना मोबाईलवर बोलणे महिलेच्या जीवावर बेतले.

मीना थावरदास गिडवाणी (५५, रा. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे माहेर तुमसर असून आई-वडिलांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या तुमसर येथे आल्या होत्या. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मीना बाजारात जात होत्या. दरम्यान त्या मोबाईलवर बोलत रस्ता पार करीत होत्या. त्यावेळी ट्रकने (क्र. एमएच ३५ के ५७२५) जबर धडक दिली. त्याखाली कोसळल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

चालकाने घटनास्थळापासून वाहनासह पळ काढला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वाहनचालक दिनेश्वर पाटील (३१, रा. छोटा रजेगाव, गोंदिया) याला अटक केली. वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रमेश कुंभरे तपास करीत आहेत.

Web Title: A woman who was visiting her sick parents was killed in a truck crash