मोबाईल पाहण्यासाठी वडिलांनी हटकले, नववीच्या विद्यार्थ्याने रागात उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 15:17 IST2023-04-08T15:17:15+5:302023-04-08T15:17:58+5:30
लाखनी तालुक्यातील घटना

मोबाईल पाहण्यासाठी वडिलांनी हटकले, नववीच्या विद्यार्थ्याने रागात उचलले टोकाचे पाऊल
गोपालकृष्ण मांडवकर
लाखनी (भंडारा) : लाखनी तालुक्यातील चान्ना या गावातील हिमांशू गणेश रघोर्ते या पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अभ्यास न करता मोबाईल पाहतो म्हणून त्याच्या वडिलांनी रात्री हटकले होते. या कारणावरून त्याने हे पाऊल उचलले.
हिमांशू हा लाखनी येथील समर्थ विद्यालयाचा नव्या वर्गाचा विद्यार्थी होता. अभ्यास न करता अधिक वेळ मोबाईलमध्ये का व्यस्त राहतो, याबद्दल त्याच्या वडिलांनी रात्री त्याला हटकले होते. त्यानंतर सर्वजण घरात झोपले असता हिमांशूने हॉलमधील लोखंडी कडीला शाळेच्या टॉयने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री सव्वाअकरा वाजता वडील लघुशंकेकरीता ऊठले असता हा प्रकार लक्षात आला.