तलावात उडी घेवून ३२ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, तुमसर येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 13:40 IST2023-04-22T13:37:13+5:302023-04-22T13:40:36+5:30

वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली, नागरिकांची घटनास्थळी गर्दी

A 32-year-old youth committed suicide by jumping into the lake. | तलावात उडी घेवून ३२ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, तुमसर येथील घटना

तलावात उडी घेवून ३२ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, तुमसर येथील घटना

इंद्रपाल कटकवार

तुमसर (भंडारा) : तुमसर येथील विनोबा भावे नगरातील हनुमान तलावात एका अविवाहित तरुणाने तलावात उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना २२ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान उघडकीस आली. दिनेश रिनायते (३२) रा. इंदिरा नगर तुमसर असे आत्महत्या करणाऱ्या अविवाहित तरुणाचे नाव आहे.

तुमसर शहरात गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. यापुर्वी एक दिवसाआधी शहरातील कुंभारे नगरात एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर घटनेची शाई वाळत नाही तोच २२ एप्रिल रोजी सकाळी शहरातील हनुमान तलावात एका अविवाहित तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे येथील सकाळी व्यायाम करणाऱ्या नागरिकांना आढळून आले.

वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली, नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलीस‌ दाखल झाले व पंचनामा करुन मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.

Web Title: A 32-year-old youth committed suicide by jumping into the lake.