जिल्ह्यात तीन महिन्यात ३५ घरफोड्या, १८९ चोऱ्या
By युवराज गोमास | Updated: April 22, 2023 16:51 IST2023-04-22T16:51:07+5:302023-04-22T16:51:35+5:30
सतर्कता बाळगण्याचे आवाहन

जिल्ह्यात तीन महिन्यात ३५ घरफोड्या, १८९ चोऱ्या
भंडारा : जिल्ह्यात जानेवारी ते मार्चपर्यंत एकूण ३५ घरफोड्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे यातील केवळ ०७ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले. याच कालावधीत गावांसह शहरात १८९ चोऱ्या झाल्या. यापेैकी ११८ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात घराबाहेर झोपतांना किंवा गच्चीवर झोपताना घर काळजीपूर्वक बंद करून सतर्कता बाळगणे हिताचे ठरणारे आहे.
भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमान ४२ ते ४३ अंशांवर गेले होते. दोन दिवस तुरळक पाऊस झाल्याने तसेच शनिवारला दुपारच्या सुमारास पाऊस झाल्याने तापमानात थोडी घट जाणवत आहे. उन्हाळ्यात तापमानाने अंगाची लाहीलाही होत असल्याने अनेकजण नैसर्गिक वातावरणात आराम करतात. गावखेड्यातील नागरिक घराबाहेर तर शहरातील गच्चीवर झोपण्यास पसंती देतात; परंतु चोरटे संधी साधून घरफोडी करून साहित्य लंपास करीत असल्याचे तीन महिन्यातील ३५ घटनांवरून दिसून येत आहे. त्यामुळे गच्चीवर झोपताना नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे.