वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 29, 2023 17:20 IST2023-09-29T17:19:51+5:302023-09-29T17:20:29+5:30
गावच्या तलाठ्यांकडून घटनेची नोंद

वीज पडून ३ शेळ्या दगावल्या, सुदैवाने गुराखी बचावला
भंडारा : भंडारा तालुक्यातील आमगाव येथील शेत शिवारामध्ये शुक्रवारी दुपारी वीज पडून ३ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. सुदैवाने शेळ्या राखणारा जगन चौधरी हा मात्र या संकटातून बचावला.
दुपारी अचानकपणे आभाळ भरून आले आणि विजेच्या कडकडासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी गावालगतच्या शेतशिवारात जगन शेळ्या राखत होत्या. पाऊस लागल्याने बचावासाठी शेळ्या मोहाच्या झाडाजवळे आल्या असता अचानकपणे वीज पडली यामध्ये लोकेश सार्वे यांची एक आणि श्यामराव वरकडे यांच्या दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. गावच्या तलाठ्यांनी या घटनेची नोंद घेतली असून महसूल विभागाकडे अहवाल पाठविला आहे.