मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:16 IST2025-09-05T12:10:20+5:302025-09-05T12:16:05+5:30

Anant Chaturdashi 2025 Chandra Grahan 2025 Mrityu Panchak: अनंत चतुर्दशीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. यानंतर भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. दोन्ही दिवशी अत्यंत प्रभावी स्तोत्र म्हटल्यास कालातीत कृपेचे धनी होऊ शकता, असे म्हटले जाते.

mrityu panchak 2025 anant chaturdashi 2025 chandra grahan 2025 recite most impactful and powerful vishnu sahasranama stotra to get infinite auspicious prosperity benefits | मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा

मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा

Anant Chaturdashi 2025 Chandra Grahan 2025 Mrityu Panchak: शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस प्रामुख्याने गणेशोत्सवाची सांगता म्हणून प्रचलित आहे. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपतीचे विसर्जन करताना बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. परंतु, अनंत चतुर्दशीला अनंताचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. यंदा २०२५ मधील अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही दिवशी मृत्यू पंचक आहे. असे असले तरी या दोन्ही दिवशी केवळ १५ ते २० मिनिटांत होणारे एक स्तोत्र अतिशय प्रभावी ठरू शकते, अनंताची अनंत कृपा लाभू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!

मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व लाभलेला चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद महिन्याच्या पूर्वार्धाची सांगता होऊन आता उत्तरार्ध सुरू होत आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्रीविष्णूंचे विशेष व्रत केले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला 'अनंत चतुर्दशी'चे व्रत केले जाते. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत. कारण हा एक वसा अहे. तो आचरणात आणणे काहीसे कठीण आहे. हे व्रत सलग १४ वर्षे करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडीलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केले जाते. तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे तेदेखील हे व्रत करू शकतात. परंतु, एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की, ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. चौदा वर्षांनंतर उद्यापन करून न थांबता, पुन्हा ते चालूच ठेवले जाते. 

मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम

अनंत व्रत करणे शक्य नसल्यास प्रभावी स्तोत्र अवश्य म्हणा

अनंत चतुर्दशीला भगवान विष्णू यांच्या अनंत अवताराची पूजा केली जाते. हे व्रत करणे शक्य नसेल तर काळजी करू नका. शास्त्रानुसार, व्रत पूजा करणे शक्य नसेल तर श्रीविष्णूंचे स्तोत्र आवर्जून म्हणावे. एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या सहस्र नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. श्रीविष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र म्हटले जाते. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. चंद्रग्रहणात आवर्जून विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे.

इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!

विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे माहात्म्य अन् महत्त्व

श्री विष्णूसहस्रनाम म्हणजे भगवान श्री विष्णूच्या एक हजार नावांचे स्तोत्र होय. वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे. श्रीविष्णू पूजनात विष्णूला अभिषेक करताना हे स्तोत्र म्हणले जाते. सत्यनारायण पूजेच्या वेळी हे स्तोत्र म्हणून श्री बाळकृष्ण अथवा शाळीग्राम यांना अभिषेक केला जातो. यात भगवान श्रीविष्णूंची भूतात्मा, हिरण्यगर्भ, मनु, पूतात्मा अशी वैदिक नावे यात दिसतात. त्याच जोडीने रुद्र, शंभू अशी काही श्रीशंकराची नावेही यात दिसतात. शिव आणि श्रीविष्णू या देवतांचे ऐक्य दाखविण्यासाठी अशी नावे आलेली आहेत, असे मत काही अभ्यासक नोंदवतात.

१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?

विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे अनन्य साधारण शुभ-लाभ

- जीवनातील विविध संकटांवर मात करण्यासाठी या स्तोत्राचे पठन करण्याची प्रथा आणि श्रद्धा दिसून येते.

- ज्यांना सवय आहे, त्यांचे हे स्तोत्र सुमारे १५ मिनिटांत म्हणून पूर्ण होऊ शकते. परंतु, ज्यांना हे स्तोत्र म्हणणे शक्य नाही, त्यांनी आवर्जून एकचित्त होऊन मनोभावे श्रवण करावे.

- लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी व्यापारी समाजात या स्तोत्राचे महत्त्व विशेष आहे.

- महर्षी व्यास यांनी सांगितले आहे की, जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

- या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हणले आहे की, महापुरुष श्रीविष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत, ती मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. 

- विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्याने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

- गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

- मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो, असे सांगितले जाते.

- ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

- जगद्गुरु शंकराचार्य या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात की, भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा. भगवंताचे चिंतन करा. सत्संग करा. दीनजनांना दान करा. 

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

 

Web Title: mrityu panchak 2025 anant chaturdashi 2025 chandra grahan 2025 recite most impactful and powerful vishnu sahasranama stotra to get infinite auspicious prosperity benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.