Ganesh Festival 2025: अमुक एक बाप्पाच नवसाला पावतो का? धर्मशास्त्रात मिळते उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 07:00 IST2025-08-30T07:00:00+5:302025-08-30T07:00:00+5:30

Ganesh Festival 2025: गणेश उत्सवाचा एक एक दिवस म्हणजे वाढती गर्दी आणि दर्शनाशी अधीरता, याबाबत धर्मशास्त्रात दिलेले स्पष्टीकरण अवश्य वाचा.

Ganesh Festival 2025: Does only a certain Bappa get Navsa? The answer is found in the scriptures! | Ganesh Festival 2025: अमुक एक बाप्पाच नवसाला पावतो का? धर्मशास्त्रात मिळते उत्तर!

Ganesh Festival 2025: अमुक एक बाप्पाच नवसाला पावतो का? धर्मशास्त्रात मिळते उत्तर!

अलीकडे गणेशोत्सवाचे(Ganesh Festival 2025) वाढते इव्हेंटीकरण पाहता सगळ्याच ठिकाणचे गणपती राजा म्हणून संबोधले जातात. कोणी नवसाला पावणारा म्हणून तर कोणाची खूप जुनी परंपरा म्हणून इतिहास व नावलौकिक आढळतो. सगळे जण तासन तास रांगेत उभे राहून, चेंगराचेंगरीत अडकून, त्रास सहन करूनही बाप्पाचे दर्शन घेतात आणि आपण कुठेच न गेल्याची खंत वाटू लागते. अशा वेळी धर्मशास्त्राने सांगितलेले दोन श्लोक सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजेत.

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?

गर्दीत, चेंगराचेंगरीत आपणही उपस्थित राहून भर घालण्यापेक्षा घरी बसून किंवा आपल्या नजीकच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणे केव्हाही इष्टच! प्रख्यात मंडळाचा बाप्पा पावतो तसा घरचा बाप्पाही पावतो, फक्त आपली श्रद्धा दृढ हवी. म्हणून दिलेले हे दोन श्लोक लक्षात ठेवा. आपले कर्म करत रहा. त्यापासून ढळू नका. काही कुठे गर्दीत लोटालोटी करून, जीव धोक्यात घालून, देवाचे दर्शन घेण्याची आवश्यकता नाही.

आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् |
सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||

भावार्थ - ज्याप्रमाणे आकाशातून पडलेले पाणी शेवटी सागराला जावून मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच जावून मिळतो.

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति|
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मन:||

भावार्थ - जो भक्त भक्तीभावाने मला (जे काही) पत्र (पान), पुष्प (फूल), फळ, तोय (पाणी) अर्पण करतो, त्या पवित्र मनाने व भक्तीभावाने अर्पण केलेल्या भेटीचा, मी स्विकार करतो.

Ganesh Festival 2025: बाप्पाच्या मूर्तीची 'ही' पाच वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आली का?

आताच्या गर्दीला आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना बाप्पा जबाबदार नाही, कुठे नियोजनाचा अभाव तर कुठे लोकांची बेशिस्त यामुळे सगळ्यांची गैरसोय होते. म्हणून निदान आपण तरी सुज्ञपणे वरील दोन श्लोक लक्षात ठेवून त्यानुसार आचरण करूया आणि शुद्ध भक्तिभाव जागृत ठेवून म्हणूया 'गणपती बाप्पा मोरया!'

Web Title: Ganesh Festival 2025: Does only a certain Bappa get Navsa? The answer is found in the scriptures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.