कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 11:14 IST2025-08-24T11:13:21+5:302025-08-24T11:14:23+5:30

Ganesh Chaturthi 2025: यावर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून, त्या दिवशी गणेश आगमन होणार आहे. गणेश पुजनाचा मुहुर्त आणि इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Ganesh Chaturthi 2025: When should Ganesh Sthapana be performed and when should Jyeshtha Gauri be worshipped? | कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती

कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती

- दा. कृ. सोमण
(पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक)

गणेश पूजनाला तब्बल साडेतीन हजार वर्षांची परंपरा
सुमारे ३.५ हजार वर्षांपूर्वी गणेश पूजनाला प्रारंभ झाला. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. म्हणून पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव म्हणजे मातीच्या गणेशमूर्तीचे पूजन करण्यास शास्त्रात सांगितले आहे. प्राचीन काळी शेतावर किंवा नदीकाठी जाऊन तेथील मातीची गणेशमूर्ती तयार करून तेथेच पूजन व लगेच विसर्जन करत असत. त्यानंतर गणेशमूर्ती घरी आणून दीड, तीन, पाच, सात किंवा अनंत चतुर्दशीपर्यंत पूजन करून नंतर मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.

यंदा गणेश आगमन कधी?
२७ ॲागस्ट २०२५ : बुधवार, भाद्रपद शुक्ल चतुर्थी

मध्यान्हकाल कधी?
२७ ॲागस्ट २०२५  बुधवारी सकाळी ११:२५ ते दुपारी १:५४पर्यंत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व षोडशोपचार पूजा करावी. 

या वेळेत शक्य झाले नाही तर?
सूर्योदयापासून दु. १:५४ पर्यंत स्थापना व पूजन करावे.

महत्त्वाचे...
- पूजनाची गणेशमूर्ती मातीचीच हवी. 
- आपण स्वत: पुस्तकावरून गणेशपूजन करू शकतो. 
-महिलाही गणेशपूजन करू शकतात.
- सजावटीसाठी थर्माकोलसारख्या पर्यावरणास घातक गोष्टींचा वापर करू नये. 
- अगरबत्ती, धूप, कापूर केमिकल फ्री असावेत. 

पुढच्या वर्षी ‘लवकर’ आगमन नाही...
पुढच्या वर्षी बाप्पांचे आगमन १८ दिवस उशिराने होणार आहे. पुढील वर्षी कारण - ज्येष्ठ अधिकमास आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही १४ सप्टेंबर २०२६ रोजी असेल.

ज्येष्ठा गौरी पूजन आणि विसर्जनाचे मुहूर्त असे...
गौरी ही गणपतीची माता पार्वती होय. तिला महालक्ष्मी असेही म्हणतात. प्रथेनुसार तेरड्याच्या, खड्यांच्या, मुखवट्यांच्या किंवा मूर्तीच्या रूपात गौरी आणल्या जातात.
कधी आणाव्यात?
३१ ॲागस्ट २०२५ रोजी रविवारी सायं. ५:२५ पर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना
पूजन कधी करावे?: १ सप्टेंबर २०२५
विसर्जन कधी करावे?
मंगळवार, २ सप्टेंबर २०२५, रात्री ९:५० पर्यंत मूळ नक्षत्रावर

 

Web Title: Ganesh Chaturthi 2025: When should Ganesh Sthapana be performed and when should Jyeshtha Gauri be worshipped?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.