बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 13:29 IST2025-08-27T13:24:14+5:302025-08-27T13:29:30+5:30

Ganesh Chaturthi 2025: देवाची मूर्ती हाताळताना, पूजा करताना अनावधानाने भंग झाली तर आपण घाबरतो, अशुभ शकुन समजतो, याबाबत धर्मशास्त्रात काय म्हटले आहे ते पाहू. 

Ganesh Chaturthi 2025: Is it inauspicious if a part of the idol breaks while bringing, carrying, or worshipping Lord Ganesha? Religious scriptures say... | बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 

बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 

आज २७ ऑगस्ट, गणेश चतुर्थीच्या(Ganesh Chaturthi 2025) मुहूर्तावर घरोघरी गणपती बाप्पा आसनस्थ झाले असतील. कोणाकडे दीड दिवस तर कोणाकडे पाच, सात, दहा दिवस बाप्पा पाहुणचार घेतील. बाप्पासाठी, सजावटीसाठी काय करू आणि किती करू असे भाविकांना होते. अशातच मूर्ती नाजूक असेल तर धक्का लागून ती दुभंगते. 

गणेश मूर्ती ही बाळाला हाताळतो तेवढ्याच काळजीने हाताळणे अभिप्रेत असते. परंतु कधी कधी अनावधानाने पूजा करते वेळी, हार घालते वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी मूर्ती जागची हलवताना मूर्तीला धक्का लागतो आणि चुकून एखादा अवयव दुखावतो. अशावेळी घाबरून जाऊ नका. अशा प्रसंगाचा दूरदृष्टीने विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे आणि त्यावर उपायही सुचवला आहे. त्याबद्दल सविस्तर वाचा. 

गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, WhatsApp Status, Messages, Quotes शेअर करत स्वागत करा गणपती बाप्पाचं!

गणेशमूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने विचार केला असता या अवास्तव भयाचे निरसन होते. त्यानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा व्रतसमाप्तीदिनी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास या अवस्थांमध्ये देवत्व नसल्यामुळे यासंदर्भात विचार करण्याचे काहीच कारण नाही. याबाबत 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया. 

प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पूजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदमच विसर्जन करावे. गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखावल्यास मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे. 

Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महारतीनंतर गणेशमूर्तीस इजा पोचल्यास दोष येत नाही. कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजेत मूर्तीमधील देवत्व त्यादिवशी आरतीपर्यंतच असते. त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे. त्यावेली मन:शांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा यथासांख्य जप करावा. 

परंतु गणेशचतुर्थीदिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पाल्यास करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास या मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. 

गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत घाबरून, धीर सोडून सैरभैर होऊ नये. कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानसिक दुर्बलता येऊ शकते. अशावेळी `ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा सहस्त्र जप करावा. तसेच 'विघ्न येऊ देऊ नकोस' अशी विघ्नहर्त्या गणेशाला प्रार्थना करावी म्हणजे मनातील सर्व शंका कुशंका दूर होतात. 

Web Title: Ganesh Chaturthi 2025: Is it inauspicious if a part of the idol breaks while bringing, carrying, or worshipping Lord Ganesha? Religious scriptures say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.