Voters will only teach those who spread rumors | अफवा पसरविणाऱ्यांना मतदारच शिकवतील धडा

अफवा पसरविणाऱ्यांना मतदारच शिकवतील धडा

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांचा ‘लोकमत’शी संवाद : मतदारांचा माझ्यावर, माझा मतदारांवर भरोसा

सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पराभव समोर दिसत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असून राष्टÑवादी काँग्रेसकडून चुकीच्या अफवा पसरवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परळीत मला निवडणूक अवघड असल्याची अफवा हा त्याचाच एक भाग आहे. परळी मतदारसंघातील जनता कायम माझ्यासोबत आहे. मतदारांनो, असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. राष्ट्रवादीचे अफवातंत्र मला अडचणीत आणण्यासाठी आहे पण परळीची स्वाभिमानी जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
औरंगाबादेतील एका पत्रकार परिषदेत मी दिलेल्या उत्तराची तोडमोड करून तो व्हिडीओ एका चॅनलवरून दाखविला आणि त्याची क्लिप सोशल मीडियावरून फिरवली जात आहे. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे मी सविस्तर उत्तर दिले असतानाही ते अर्धवट दाखवून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे मी माझा मतदारसंघातच काय संपूर्ण बीड जिल्हा, राज्यात माझ्या खात्यातर्फे अनेक विकासाच्या योजना राबविल्या, विकास कामांना भरीव निधी दिला. मी विकासाचे राजकारण करणारी आहे. मी केलेली विकास कामे हीच माझी ताकद आहे. मी पाच वर्षे काय केले हे जनतेला चांगलेच माहीत आहे म्हणून मायबाप मतदार हे अशा अफवा अथवा भूलथापांना बळी पडत नाही, असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
मी निवडणुकीपुरती लोकांसमोर जात नाही तर पाच वर्षे त्यांच्या संपर्कात विकास कामांच्या माध्यमातून असते. मी पाच वर्षे काय केले हे मला निवडणुकीत मतदारांना सांगावे लागत नाही, ते मतदारांसमोर असते. त्यामुळेच मतदारांचा माझ्यावर आणि माझा मतदारांवर भरोसा आहे. मी कधी मतांचे राजकारण केले नाही तर विकासाचे केले आहे. म्हणूनच आम्ही मतदारांच्या मनात आहोत आणि मनात असल्यामुळेच ते आमच्या मतात परावर्तित होते. खोटेनाटे व्हिडीओ क्लिप, मेसेज फिरवून मते मिळत नसतात किंवा मतदारांना जिंकता येत नाही तर त्यासाठी विकास कामे करावी लागतात, असेही पंकजा मुंडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस मला अडचणीत आणण्यासाठी राज्य पातळीपासून गाव पातळीपर्यंत प्रयत्न करीत आहे, हे आता जनतेलाही माहीत झाले आहे. मला रोखण्यासाठी माझ्या वाटेत काटे पेरण्याचे पाप राष्ट्रवादीकडून केले जात असले तरी माझ्यावर प्रेम करणाºया जनतेसाठी मी पायघड्याच घालणार आहे. कारण माझ्या बाबांपासून जनता आमच्या सोबत आहे. त्यांचे उपकार कधीही विसरता येणार नाहीत. मला कितीही त्रास झाला तरी जनतेला विकास देण्यात मी कमी पडणार नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचा जनसेवेचा वसा आणि वारसा चालविण्यासाठी मला मतदारांनी भरभरून आशिर्वाद द्यावा असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले.
५ वर्षे मतदारांच्या संपर्कात : जनतेला सत्य माहीत
मुंडेसाहेबांनी वंचित आणि उपेक्षतिांचा आवाज बणून काम केले, मीसुद्धा सत्तेचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी करीत आहे. मतदारांनी आम्हाला भक्कम साथ देत आमच्यावर खूप उपकार केले आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
मला अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण तुमच्या बळावर राष्ट्रवादीला मी पुरु न उरणार आहे. तुम्हाला अभिमान वाटेल असे काम करणार आहे.
निवडणुका येतात, जातात. परंतु, राजकारण करताना सकारात्मकता असली पाहिजे. आम्ही नेहमी विकासाचेच राजकारण करतो, असे पंकजा म्हणाल्या.

Web Title: Voters will only teach those who spread rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.