माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:01 IST2024-11-23T14:01:44+5:302024-11-23T14:01:58+5:30
आघाडी खूप कमी असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही लढाई जाईल असे चित्र आहे.

माजलगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादीत कांटे की टक्कर; 19 व्या फेरीत प्रकाश सोळंकेंना अल्प आघाडी
माजलगाव: मतदार संघात पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत होत आहे. येथे 18 व्या फेरीत शरद पवार गटाचे मोहन जगताप यांना 1 हजार 94 मतांनी आघाडी होती. मात्र, 19 व्या फेरीअखेर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी 19 मतांची अल्प आघाडी घेत चित्र पालटले आहे. मात्र, आघाडी खूप कमी असल्याने शेवटच्या फेरीपर्यंत ही लढाई जाईल असे चित्र आहे.
अजित पवार राष्ट्रवादी, भाजप, शिंदे शिवसेना महायुतीकडून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके, शरद पवार राष्ट्रवादी, शिवसेना, कॉँग्रेस महाविकास आघाडीचे मोहन जगताप, अपक्ष रमेश आडसकर,अपक्ष माधव निर्मळ या प्रमुख उमेदवारासह ६४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, येथे पवार विरुद्ध पवार असाच सामना रंगला आहे. 18 व्या फेरीपर्यंत शरद पवार गटाचे मोहन जगताप पुढे होते. तर 19 व्या फेरीत अचानक अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आघाडीवर आले आहेत. त्यांनी 19 मतांची अल्प आघाडी घेतली असून आता चित्र बदलू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अपक्ष उमेदवार रमेश आडसकर, माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे यांनी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील काही मते घेतली आहेत. आता सोळंके आणि जगताप यांच्यातच निर्णायक लढत होत आहे.