अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 20:10 IST2020-10-04T20:09:35+5:302020-10-04T20:10:08+5:30

मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्‍टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

Otherwise there will be a sit-in movement | अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

परळी : मराठा समाजाच्या आरक्षणास न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवावी, यासाठी शासनाने प्रयत्न करावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ८ ऑक्‍टोबरपासून परळी तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

रविवारी अक्षता मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या मराठवाडास्तरीय बैठकीत ही घोषणा करण्यात आली. २०१८ मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे २१ दिवस ठिय्याआंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन राज्यभर गाजले आणि आंदोलनाला काही प्रमाणात यशही प्राप्त झाले. त्यामुळे पुन्हा आता बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे परळी येथील समन्वय देवराव लुगडे दिली.

बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद व इतर जिल्ह्यातील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Otherwise there will be a sit-in movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.