विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:59 PM2019-10-19T23:59:07+5:302019-10-20T00:00:51+5:30

सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

Opposition rumors, mischief will not affect voters | विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

Next
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर। विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही

बीड : निवडणूक समोर ठेवून विकासाच्या चांगल्या कामात विरोधकांकडून भांडवल केले जात आहे. केवळ विरोधाला विरोध आणि व्यक्तीद्वेषातून आमच्या विरोधात राजकारण करून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल केली जात आहे. परंतु, सुजाण मतदार या अफवांना बळी पडणार नसून विकासाला मतदान करणार आहेत, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. विधानसभा निवडणूक म्हणजे पोरखेळ नाही,असेही ते म्हणाले.
बीड शहरातील विविध ठिकाणी घेतलेल्या सभेत ते बोलत होते.
जनतेला चांगल्या प्रकारे नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून अमृत अटल पाणीपुरवठा आणि भूमिगत गटार योजनेचे काम हाती घेतले आहे. भविष्याचा विचार करून कायमस्वरूपी चांगले काम व्हावे, यासाठी शहरातील रस्ते खोदून पाईप लाईन टाकण्यात येत आहे. संभाव्य पावसाळा लक्षात घेता हे काम लांबविले होते, परंतु, विरोधकांनी उपोषणे करून प्रशासनावर दबाव आणल्यामुळे हे काम सुरु करावे लागले. शासनाने जीवन प्राधिकरणकडे ही कामे दिली आहेत. परंतु, गुत्तेदारामार्फत अतिशय संथगतीने हे काम सुरू असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. परंतु, विरोधकांकडून याचे भांडवल केले जात असल्याचे बीड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात आणि माझ्या आमदारकीच्या काळात झालेली विकास कामे जनतेला माहीत असल्यामुळेच मतदार अशा अफवा, भूलथापांना बळी पडत नाहीत, असेही जयदत्तअण्णा म्हणाले. बीड पालिकेने गेल्या तीन वर्षात विकासाच्या अनेक योजना शासनाकडून मंजूर करून घेतल्या गेल्या. त्याची कामे आज चालू आहेत, जनतेच्या अडीअडचणीला कर्तव्य समजून आम्हीच धाऊन येतोत, हे संपूर्ण बीड मतदार संघाला माहीत आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही, असेही जयदत्तअण्णा म्हणाले.

Web Title: Opposition rumors, mischief will not affect voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.