परळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या खैसर राजा खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:25 IST2026-01-15T15:25:16+5:302026-01-15T15:25:43+5:30

उपनगराध्यक्षपद भाजपला मिळेल, अशी अपेक्षा होती. 

NCP's Khaiser Raja Khan elected as Deputy Mayor of Parli Municipality | परळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या खैसर राजा खान

परळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या खैसर राजा खान

परळी: परळी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) प्रभाग क्रमांक ९  च्या नगरसेविका खैसर राजा खान पठाण यांची गुरुवार(१५ जानेवारी) रोजी निवड करण्यात आली. परळी नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या महिला नगराध्यक्ष असताना आता उपनगराध्यक्षपदी महिलाकडे देण्यात आले आहे. नगरपालिकेत महायुतीचे स्पष्ट संख्याबळ असतानाही उपनगराध्यक्षपद भाजपाला न मिळाल्याने शहराच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

परळी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 15 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती दुपारी  दीड पर्यंत उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पीठसान अधिकारी म्हणून विक्रम मांडुरके यांनी काम पाहिले.

परळी नगरपालिकेत सध्या महायुतीचे सत्ता-वर्चस्व असून नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी निवडून आले आहेत. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना शिंदे , अपक्ष , मित्र पक्षांचा संयुक्त गट २४ नगरसेवकांचा, भाजप व अपक्षांचा गट ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) २, तर काँग्रेसचा १ नगरसेवक आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार), भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा समावेश आहे.

नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर उपनगराध्यक्षपद भाजपाला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार भाजपकडून योगेश मेनकुदळे, प्रा. पवन मुंडे आणि अंजली माळी-बनसोडे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात उपनगराध्यक्षपद भाजपाला न देता ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) कडेच ठेवण्यात आले आणि खैसर राजा खान पठाण यांची निवड करण्यात आली. परळीचे माजी नगरसेवक राजा खान हे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांचे यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत.

Web Title : खैसर राजा खान परली नगरपालिका के उप महापौर निर्वाचित।

Web Summary : राकांपा (अजित पवार गुट) के खैसर राजा खान परली के उप महापौर चुने गए। गठबंधन में भाजपा की ताकत के बावजूद, राकांपा ने पद बरकरार रखा, जिससे राजनीतिक चर्चा छिड़ गई। खान धनंजय मुंडे के करीबी हैं।

Web Title : Khaisar Raja Khan elected Deputy Mayor of Parli Municipality.

Web Summary : Khaisar Raja Khan of NCP (Ajit Pawar faction) elected as Deputy Mayor of Parli. Despite BJP's strength in the alliance, NCP retained the position, sparking political discussions. Khan is close to Dhananjay Munde.