Maharashtra Election 2019 : VVPAT changed 82 places in 6 constituencies in Beed district | Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 82 ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलले

Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 82 ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलले

बीड : जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज निवडणूक होत आहे. यावेळी 3 वाजेपर्यंत 82 ठिकणी व्हीव्हीपॅट खराब झाले होते. त्याठिकाणी तात्काळ यंत्र बदलण्यात आले होते. 

बीड मतदार संघात 6 ठिकाणी, गेवराई 13 ठिकाणी, माजलगाव 12, आष्टी 12, केज 17, परळी 22 ठिकाणी यंत्र बदलण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सकाळी ढगळ वातावरण व रिमझिम पावसामुळे मतदानाच्या टक्का कमी होत. नंतरच्या काळात पाऊस बंद झाल्यामुळे मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.

दरम्यान, बीड जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.63 टक्के मतदान झाले आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : VVPAT changed 82 places in 6 constituencies in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.