Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:59 IST2025-12-21T12:58:45+5:302025-12-21T12:59:29+5:30
Georai Nagar Parishad Election Result 2025: भाजपने 14 तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने 4 जागांवर विजय मिळवला आहे.

Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
Georai Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बीड जिल्ह्यातून भाजपसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील गेवराई नगर परिषदेत भाजच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी झाल्या आहेत. यासह, भाजपने 14, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट)ने 4 जागांवर विजय मिळवला आहे.
गेवराईतील विजयी उमेदवार
प्रभाग क्र. 1
अ) बेदरे गंगुबाई त्र्यंबकराव (भाजप) – विजयी
ब) राजेश नारायण टाक (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 2
अ) प्रशांत महादेव राख (भाजप) – विजयी
ब) मडके राधिका सोपान (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 3
अ) भाले ज्ञानेश्वर अशोक (भाजप) – विजयी
ब) बागवान जकिराबी सलाउद्दीन (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 4
अ) घोडके संगीता दादासाहेब (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी
ब) शाहरुख खान ताजखान पठाण (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी
प्रभाग क्र. 5
अ) कविता एकनाथ लाड (भाजप) – विजयी
ब) घुंबर्डे रेवती भगवान (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 6
अ) महेश मधुकर सौदरमल (भाजप) – विजयी
ब) आसिया शफिओद्दीन सय्यद (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 7
अ) सुमित्रा नाना थोरात (भाजप) – विजयी
ब) कानगुडे आप्पासाहेब विठ्ठल (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 8
अ) सुतार सोनाली सुभाष (भाजप) – विजयी
ब) संभाजी मधुकर रत्नपारखे (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 9
अ) धोंडलकर अंकिता भरत (भाजप) – विजयी
ब) राक्षसभुवनकर राजेंद्र राधाकृष्णराव (भाजप) – विजयी
प्रभाग क्र. 10
अ) संभाहरे रेणुका शिवलिंग (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी
ब) शेख खाजा कठुमिया (राष्ट्रवादी – अजित पवार गट) – विजयी
भाजप - 14 जागा
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 4 जागा
गेवराईतील निकालाच्या पार्श्वभूमीवर हद्दपारीची कारवाई
गेवराईत मतदानाच्या दिवशी बाळराजे पवार आणि जयसिंह पंडित यांच्या गटात मोठा राडा झाला होता. या घटनेमुळे मतमोजणीच्या वेळी पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी गेवराईत तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाची दखल घेत, पोलिसांनी आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित व पुतण्या पृथ्वीराज पंडित यांच्यासह भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराज पवार यांना गेवराई व बीड तालुक्यांतून 48 तासांसाठी हद्दपार केले आहे.