Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२३: मकर संक्रांतीला धनलक्ष्मी योग, नोकरीत लाभ; मौजमजेचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-01-15 06:04:19 | Updated: January 15, 2023 06:04 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: नोकरीतील ताणतणाव कमी होतील. काही अनपेक्षित लाभ होतील; मात्र लोक तुम्हाला मदत करत असताना त्यांचे इरादे काय असतील याचा अंदाज घेतलेला बरा. एकदम हुरळून जाऊ नका. आर्थिक अडचणी दूर होतील. काहींना मनाजोगा प्रवास करता येईल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. कार्यक्षेत्रात काही बदल होतील.

वृषभ: या सप्ताहात संमिश्र ग्रहमान राहील. कामे आटोक्यात येतील; पण त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात भरभराट होईल. तुमचा फायदा होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळेल. 

मिथुन: कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल. कामात सतत कार्यरत राहावे लागेल. जीवनसाथीच्या सल्ल्याने योग्य निर्णय घ्या. कायद्याची बंधने पाळा. त्याबाबतीत बेफिकिरीची वृत्ती कामाची नाही. विरोधकांच्या कारवाया चालू राहतील. तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

कर्क: विविध पातळीवर यश. नोकरीत अनुकूल बदल होतील. कामाचा ताण कमी होईल. मुलांचे कौतुक होईल. नवीन संधी मिळेल. समाजात तुमचा गौरव होईल. एखाद्या उपक्रमात सहभागी व्हाल. जोडीदार चांगली साथ देईल. काहींना भेटवस्तू मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील.

सिंह: बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेले काम मार्गी लागेल. मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडतील. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत अनुकूल बदल घडतील. तुमचा फायदा होईल. मुलांच्या यशामुळे मन प्रसन्न राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ. समाजात मान वाढेल. 

कन्या: आर्थिक आवक चांगली राहील; मात्र त्यासाठी बरीच धडपड करावी लागेल. पैशाचे व्यवहार जपून करा. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल; मात्र कागदपत्रे नीट पाहून घ्या. भावंडांशी सख्य राहील. व्यवसायात विक्री चांगली राहील. नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. काहींना नवीन जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. 

तूळ: आपल्या अनेक अडचणी दूर होतील. बरेच दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्या दूर होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत कामाचा व्याप सांभाळताना दमछाक उडेल. सुखसोयी वाढतील.

वृश्चिक: अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अडचणी दूर होतील. भेटवस्तू मिळतील. व्यवसायात बरकत राहील. घर, शेती खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील. 

धनु: हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. लोकांची चांगली साथ राहील. तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनतील. घरात मिठाई आणली जाईल.

मकर: नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या भेटी होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. अडचणी कमी होतील.

कुंभ: हाती घ्याल ते तडीस न्याल, अशी परिस्थिती राहील. तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जाईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. विविध प्रकारचे फायदे होतील, भेटवस्तू मिळतील, चांगल्या बातम्या कानावर पडतील. काहींना अचानक एखादी मोठी संधी मिळेल. 

मीन:  थोड्या अडचणी समोर येतील. मात्र आपण मुत्सद्दीपणाने वागून त्यातून मार्ग काढाल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करता येईल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन प्रकल्प यशस्वीपणे राबवाल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App