राशी भविष्य

वृश्चिक

हा महिना आपल्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. प्रेमीजन खुश होतील. त्यांना प्रेमिकेचे पूर्ण सहकार्य मिळेल. जर काही समस्या असलीच तर ती सामंजस्याने दूर करण्याचा प्रयत्न देखील करतील. त्यामुळे आपणास समजेल कि आपण योग्य व्यक्तीची निवड केली आहे. विवाहितांचे जीवन समस्याग्रस्त राहील. आपण आपल्या जोडीदारास खुश करण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यांच्या तापट स्वभावाने आपण त्रासून जाल. ह्या महिन्यात आपणास कोणत्याही प्रकारे आर्थिक स्थितीची चिंता करावी लागणार नाही. ह्या महिन्यात आपणास अपेक्षीत पैसे आपल्याला मिळू शकतात. ह्या महिन्यात आपणास अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. एखादी पैतृक संपत्ती मिळण्याची संभावना सुद्धा आहे. अशा परिस्थितीत आपणास आर्थिक स्थितीची चिंता करावी लागणार नाही. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. ह्या दरम्यान आपण एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेतल्यास तो आपल्या हिताचा असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती वरिष्ठ सांगतील त्या प्रमाणे काम करतील. आपले काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरेल. ह्या महिन्यात विद्यार्थी अभ्यासाच्या बरोबरीने इतर प्रवृत्तीत सहभागी होतील. त्यांना दोघात समतोल साधता आल्यास अति उत्तम. ते एखादे आव्हान सुद्धा स्वीकारू शकतात. अर्थात त्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. हा महिना आरोग्याच्या बाबतीत आपणास मिश्र फलदायी ठरणारा असल्याने ह्या महिन्यात बाहेरगांवी कोठेही जाण्याचा बेत आखू नका. ह्या महिन्यात अशक्तपणाने आपण त्रासून जाल, व त्यामुळे आपणास कामाचा कंटाळा सुद्धा येऊ शकतो.