राशी भविष्य

मकर

हा महिना आपल्यासाठी अनुकूल व शुभ राहणारा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा तणावग्रस्त असेल. नोकरीत चढ - उतार येतील. आपणास आपल्या कामावर जास्त लक्ष द्यावे लागेल. आजूबाजूच्या तणावा पासून दूर राहा. आपली कामगिरी उत्तम करण्यावर भर द्या. अहंकार बाजूस सारल्यास सर्वकाही सुरळीत होईल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना फायदेशीर होऊ शकतो. आपणास आपल्या व्यापारात नवीन सौदा करता येईल, व त्यामुळे व्यापारात सुधारणा देखील होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन संतुलित होईल. आपसातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. एकमेकां बद्धलचे आकर्षण वाढेल. आपण आपल्या नात्याचा आनंद उपभोगू शकाल. आपल्यातील जवळीक वाढेल. आपण आपल्या नात्यास विवाहा पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अध्ययनात सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगता येऊ शकते. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.