राशी भविष्य

धनु

हा महिना आपणास गोंधळात टाकणारा आहे. प्रेमीजन एकमेकांप्रती आकर्षित तर होतील, परंतु सतत भेटल्याने नात्यात भरपूर तणाव सुद्धा निर्माण होईल. आपणास हा तणाव घालविण्यासाठी काही काळ एकमेकांपासून दूर राहावे लागेल. विवाहितांना आपल्या नात्यावर पूर्ण लक्ष ठेवावे लागेल. एखादी समस्या असल्यास कुटुंबियांशी चर्चा करून ती सहजपणे दूर करावी लागेल. ह्या महिन्यात आपणास खर्चाचा हिशोब ठेवावा लागेल. काही खर्च आपली इच्छा नसताना सुद्धा आपणास करावे लागतील, ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामात एखादी समस्या उदभवल्यास ते आपल्या सहकाऱ्यांची मदत घेऊ शकतात, जी त्यांना सहजपणे मिळू शकेल. आपल्या प्रगतीत कोणतीही अडचण येणार नाही. व्यापारात आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. आपण जुन्या प्रकल्पांसह काही नवीन प्रकल्पांसाठी बैठक आयोजित करून लोकांच्या भेटीगाठी घेणे चालूच ठेवाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार यश न मिळाल्याने ते थोडे त्रस्त होतील. परंतु त्यांनी निराश न होता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे यशस्वी होण्यात कोणताही त्रास होऊ शकणार नाही. ह्या महिन्यात आपणास आरोग्य विषयक काही त्रास होण्याची संभावना आहे. काही समस्या असल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. त्याच बरोबर काही तपासण्या सुद्धा करून घ्याव्यात. तंदुरुस्त राहण्याकडे आपणास लक्ष ठेवावे लागेल.