राशी भविष्य

मीन

हा महिना आपणास काही महत्वाची पाऊले उचलावयास लावणारा आहे. आरोग्याच्या बाबतीत आपणास सावध राहावे लागेल. कोणत्याही प्रकारे शारीरिक त्रास होणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल. छातीत दुखणे किंवा कफ आपणास त्रस्त करू शकतात. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्याने विद्यार्थी खुश होऊ शकतात. ते आपली योग्यता वारंवार तपासून एखाद्या नवीन परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. व्यापाऱ्यांना महत्वाचे पाऊल उचलण्याची हि वेळ आहे. आपण जितकी मेहनत आपल्या व्यापारासाठी कराल त्याहून कमी परिणाम मिळतील. तेव्हा जास्त जोर लावा. नोकरी करणाऱ्यांना थोडे सावध राहून कामे करावी लागतील. जास्त ताण न घेता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. लोकांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देऊ नये. आर्थिक दृष्ट्या महिना चांगला आहे. आपल्या प्राप्तीत वृद्धी झाली तरी महिन्याच्या अखेरीस खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यावर आपणास लक्ष ठेवावेच लागेल. प्रणयी जीवनास महिना चांगला आहे. आपण प्रेमिकेच्या सहवासात जास्त वेळ घालवू शकाल, त्यामुळे इतर कामांना योग्य तितका वेळ देता येणार नाही. विवाहित व्यक्ती अतिथी सत्कारात व्यस्त राहतील. त्यांचे स्वतःचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराशी संबंध दृढ होतील.