जर आपणास आकड्यांचा खेळ खेळण्यास आवडत असेल तर आजचा दिवस महत्वाच्या गोष्टींचा हिशोब ठेवण्याचा असल्याचे गणेशास दिसत आहे. आपला कल जलदगतीने काम करून काळजीपूर्वक निर्णय घेण्याकडे असेल. आपल्या तार्किक शक्तीचा जास्तीत जास्त वापर करून आपण योग्य असा निवाडा करू शकाल.