Maharashtra Election 2019: अमरावती जिल्ह्यात छाननीअंती २२ उमेदवारी अर्ज बाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 19:50 IST2019-10-05T19:50:33+5:302019-10-05T19:50:38+5:30
अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत छाननीअंती २२ अर्ज बाद झाले आहेत.

Maharashtra Election 2019: अमरावती जिल्ह्यात छाननीअंती २२ उमेदवारी अर्ज बाद
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत छाननीअंती २२ अर्ज बाद झाले आहेत. यातील अमरावती ३, बडनेरा २, मोर्शी ३, दर्यापूर ५, तिवसा ५, धामणगाव रेल्वे १, मेळघाट ४, तर अचलपूर मतदारसंघातील संपूर्ण २४ उमेदवारी अर्ज वैध ठरले.
अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील १७२ उमेदवारांनी २२९ उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केले होते. त्यातील शनिवारी पडताळणीअंती २२ उमेदवारी अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने बाद ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाद्वारा प्राप्त झाली.