Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या सोईसाठी शकुंतला ब्रॉडगेज करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 01:20 IST2019-04-14T01:19:23+5:302019-04-14T01:20:37+5:30

दर्यापूर येथे बंद पडलेली सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू व या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शकुंतला रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी दर्यापूर येथे प्रचारसभेत दिली.

Lok Sabha Election 2019; Shakuntala Broadgase for the convenience of the farmers | Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या सोईसाठी शकुंतला ब्रॉडगेज करणार

Lok Sabha Election 2019; शेतकऱ्यांच्या सोईसाठी शकुंतला ब्रॉडगेज करणार

ठळक मुद्देदर्यापूरच्या सभेत गोविंदाची उपस्थिती; नवनीत राणांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर येथे बंद पडलेली सूतगिरणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करू व या भागातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शकुंतला रेल्वेचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी दर्यापूर येथे प्रचारसभेत दिली. यावेळी सिनेअभिनेता गोविंदा विशेष आकर्षण होते.
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, सूतगिरणीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे तसेच या तालुक्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता, प्रत्येक घरापर्यंत पाइप लाइन टाकण्यासाठी प्रयत्न करू व शकुंतलाच्या ट्रॅकवरील प्रत्येक गावात रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यावेळी सिनेअभिनेता गोविंदा यांचा रोड शो व प्रचारसभा आयोजित करण्यात आली. जिल्ह्याच्या विकासासाठी महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांना बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन गोविंदा यांनी केले. सभेला महाआघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha Election 2019; Shakuntala Broadgase for the convenience of the farmers