Lok Sabha Election 2019; अभिनेता सुनील शेट्टी यांचा ‘रोड-शो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:58 IST2019-04-13T00:55:54+5:302019-04-13T00:58:03+5:30
महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ धारणी, चुर्णी येथे गुरुवारी अभिनेता सुनील शेट्टी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. रुपेरी पडद्यावरील सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासासाठी आदिवासींनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शेट्टी यांच्या ‘रोड-शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Lok Sabha Election 2019; अभिनेता सुनील शेट्टी यांचा ‘रोड-शो’
अमरावती : महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांच्या प्रचारार्थ धारणी, चुर्णी येथे गुरुवारी अभिनेता सुनील शेट्टी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. रुपेरी पडद्यावरील सुनील शेट्टी यांची झलक बघण्यासासाठी आदिवासींनी एकच गर्दी केली होती. दरम्यान शेट्टी यांच्या ‘रोड-शो’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
नवनीत राणा, माजी आमदार राजकुमार पटेल, केवलराम काळे, युवा स्वाभिमान संघटनेचे मेळघाट संपर्कप्रमुख उपेन बछेल, अचलपूर तालुका अध्यक्ष रवींद्र गवई, दुर्योधन जावरकर, राम हेकडे, मुकेश मालवीय, मनीष मालवीय, देवेंद्र टिब, दयाशंकर पाल, मधुसूदन जाणे, विकास मोरे, सुनील साबुलाल, मनोज धांडे, शोएब मेमन, सोनू पठाण, राजेश वर्मा, वर्षा जयस्वाल, पवन पाठणकर, अर्जुन पवार, सुनील डोंगरे,राहूल कविटकर, डॉ. अस्लम, नामदेव सोळदकर, सोबाराम मेटकर, तनीराम धुर्वे, राम बेडेकर, नंदू केडे, शत्रुघ्न हिरालाल, किरण भिलावेकर आदी यावेळी उपस्थित होते. आदिवासींवर अन्याय, अत्याचार करणार नाही, हा मातृशक्तीचा विश्वास असल्याचे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.
अभिनेता सुनील शेट्टी यांच्या रोड शो दरम्यान धारणी येथील रस्त्यावर आदिवासींची गर्दी लक्षणीय ठरली. मेळघाटातील प्रश्न, समस्या आणि कुपोषणाचा लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी दिल्ली येथे नवनीत राणा यांना संसदेत पाठवा, अशी भावनिक साद त्यांनी घातली.
चुर्णी तालुका बनविणार
चुर्णी येथील लोकसंख्या पाहता ते तालुका बनविणार, असा दृढ निश्चय नवनीत राणा यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला. दरम्यान आयोजित जाहीर सभेला जमलेला जनसमुदाय नवनीत राणा यांच्या विजयाची साक्ष देणारा ठरला.