Lok Sabha Election 2019; ५८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:12 AM2019-04-12T01:12:16+5:302019-04-12T01:13:32+5:30

नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले.

Lok Sabha Election 2019; 58 percent voting | Lok Sabha Election 2019; ५८ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; ५८ टक्के मतदान

Next

पाच तालुके : नाव शोधण्यासाठी धावपळ, बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवांचे मतदान
वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी विधानसभा मतदारसंघातील पाच तालुक्यांत गुरुवारी सरासरी ५८ टक्के मतदान झाले. उशिरा रात्रीपर्यंत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मुख्यालयी पोहोचले नसल्याने पाच वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानावर सरासरी मतदानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
नांदगाव तालुक्यात मतदारांचा उत्साह
नांदगाव खंडेश्वर : वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडण्यासाठी गुरुवारी झालेल्या मतदानाकरिता मतदारांनी कमालीचा उत्साह आढळून आला. सकाळी १० वाजता मतदान केंद्रावर मतदाराच्या लांब रांगा लागल्या होत्या. दुपारच्या रखरखत्या उन्हात काही ठिकाणी मतदारसंख्या रोडावली. मात्र, उन्ह उतरल्यानंतर पुन्हा एकदा रांगा लागल्या. नांदगाव शहरात ११ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते ११ या चार तासात सुमारे १४ टक्के मतदान झाले. तालुक्यातील विविध गावांमध्येही मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. येथील २४७ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. पण, अवघ्या काही मिनिटांतच ती झोनल आॅफिसरने दूर केली. गोंधळ न होता तेथील मतदान पूर्ववत सुरू झाले. २४९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांच्या टेबलवरील पंखा बंद होता.

गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदार यादीत नावच नसल्याने जवळपास तीनशे मतदारांना परत जावे लागले. गत निवडणुकीत मतदान करूनही आपले नाव बेपत्ता झाल्याने या मतदारांनी प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली.

धामणगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजता मतदान सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या अभिरुप चाचणीत ईव्हीएममध्ये बिघाड आल्याचे लक्षात आल्याने. धानोरा शिक्रा, सातरगाव, टाकळी, दहेगाव, शिवणी रसुलापूर येथील मशीन बदलविण्यात आल्या.

शहरातीलच ८९ क्रमांकाच्या मतदान केंद्रांवरील ईव्हीएम दीड तास बंद राहिल्याने मतदान खोळंबले. दीड तासाने मतदान सुरू झाले. मशीन बदलविण्यासाठी तब्बल दीड तास वेळ झाल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

एरवी प्रत्येक निवडणुकीत शतप्रतिशत मतदान व्हावे, यासाठी राजकीय कार्यकर्ते, त्यातही तरुण आघाडीवर असतात. मात्र, गुरुवारी तालुकाभर हे चित्र कुठेही दिसले नाही. मतदानाचा टक्का घसरल्याची चर्चा परिसरात पाहायला मिळाली.

Web Title: Lok Sabha Election 2019; 58 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.