जनतेच्या आशीर्वादाने विजय संपादन केल्यास महाविकास आघाडीलाच पाठिंबा : विक्रम ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:58 IST2024-11-16T10:56:37+5:302024-11-16T10:58:10+5:30
Amravati : शेंदूरजना घाट येथील सभेत स्पष्ट केली भूमिका

If victory is achieved with the blessings of the people, support for Mahavikas Aghadi: Vikram Thackeray
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदुरजना घाट :मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शेंदूरजना घाट, मलकापूर या दोन्ही शहरांमध्ये पार पडलेल्या रॅली व सभेत हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेले मतदारांनी विक्रम ठाकरे यांच्या विजयाचे संकेत दिले.
शेंदूरजना घाट गुजरी बाजार याठिकाणी विक्रम ठाकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. मतदारांना आवाहन करताना विक्रम ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, मतदारांच्या सहकार्याने मी विजय संपादन केल्यास माझा पहिला पाठिंबा हा महाविकास आघाडीलाच राहील, असे मत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन चालणारा कार्यकर्ता असून, माझ्यावर झालेले संस्कार हे मानवतावादी आणि सर्वसमावेशक वृत्तीचे आहे. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे बहुसंख्येने तळागाळातील कार्यकर्ते जुळलेले असून, मी महाविकास आघाडीसोबत कायम राहणार आहे. सध्या विक्रम ठाकरे विषयी अफवांचा बाजार मांडला जात आहे.
या अफवा पसरविणाऱ्यांनी आजच आपला पराजय मान्य केलेला आहे. माझी अनुक्रमांक १७ नंबरची लिफाफा या चिन्हासमोरील बटन खऱ्या अर्थाने जनतेला विश्वास प्रदान करणारे आहे. मी जनता जनार्दनाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.